रत्नागिरी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 कलापथक संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, आरोग्य विभाग, जिल्हा माहिला व बाल विकास विभाग, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आदी विभागांच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत कलापथकांद्वारे माहिती देण्याचे कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी सुरु आहेत.
त्याचबरोबर आकाशवाणी तसेच दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी एसटी बस स्थानकावरुन देखील जिंगल्सद्वारे शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची प्रसिध्दी सुरु आहे.












