राजकीय मृदुंग सुद्धा मला चांगला वाजवता येतो

शृंगारतळीतील युतीच्या प्रचार सभेत पालकमंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

गुहागर प्रतिनिधी   
कोकणची संस्कृती कायम टिकली पाहिजे. मी नमन, भजन, जाखडी या सर्वांचा चाहता आहे. त्यामुळे देवखेळे बाबत जे काही आक्षेपार्ह असेल तर ती वेब सीरिज बंद करण्याची मागणी राज्य शासनाकडे आपण नक्कीच करू असे आश्वासन देत आपल्याला नमनातील व राजकीय मृदंग चांगला वाजवता येतो असा टोला सध्या विरोधक ‘ देवखेळे’ बाबत राजकारण करून त्याचा प्रचारासाठी वापर करत आहेत. त्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला. शृंगारतळी येथील युतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आम. डॉ. विनय नातू,माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप तालुकाध्यक्ष अभय भाटकर, शिवसेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, नगराध्यक्षा नीता मालप,तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती चे सर्व युतीचे उमेदवार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सामंत म्हणाले की, महायुती सरकारने अनेक योजना सर्वसामान्य जनतेसाठी आणल्या आहेत.मात्र लाडकी बहीण सारखी सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना विरोधक बंद करू पाहत होते.महायुती सरकार हेच सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या. विकास कामांसाठी लागणारा निधी मी उपलब्ध करून देईन असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.