उद्योगांची निर्मिती करून कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग आणखी श्रीमंत करा! केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे

सिंधुनगरी : बाळ खडपकर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कोटी लोकांना घरकुले, ११ कोटी लोकांना पाण्याची पाईपलाईन निर्माण करताना नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरही लक्ष दिले. देशातील उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. केरळमधील काथ्या उद्योग आसाम मधील बांबू उद्योगांचे प्रेरणा येथील उद्योजकांनी घ्यावी. जिल्ह्यातील दोन तृतीयांश पडीक जमिनीचा त्यासाठी वापर करावा व नवे उद्योग निर्माण करून कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग आणखी श्रीमंत करावा असे आवाहन सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

सिंधुनगरी येथील शरद कृषी भावनांमध्ये केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयामार्फत नवउद्योजक व बचत गटांना मार्गदर्शन करणारी कार्यशाळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. यावेळी व्यासपीठावर खाली बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीनजी कुमार संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण शुक्ला, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळशेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,भाजपाच्या महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी सौ नीता राणे, प्रज्ञा ढवण, गजानन गावडे, नॅसकॉम फाउंडेशनचे प्रमुख डॉ. चेतन सामंत उपस्थित होते.

देशातील उद्योग व्यवसायाने मोठी भरारी घेतली आहे. अनेक प्रांतात निर्यात क्षम उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश तिसऱ्या स्थानावर यावा यासाठी प्रयत्न सुरू केले असून देशाच्यातील उद्योग क्षेत्राला चालना दिली आहे. नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी दिशा दिली आहे. अनेक राज्यानी उद्योग व्यवसायाच्या विस्तारासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्यामुळे निर्यात क्षम उद्योग या देशात उभे राहत आहेत. खरे तर आपल्या देशात अजूनही गरिबी दारिद्र्य कुपोषणाचा प्रश्न भेडसावत आहे. हे प्रश्न सोडवितानाच देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राला चालना देऊन नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहिला आहे.

कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग जिल्हा काही वर्षांपूर्वी दरडोई उत्पन्नात फारच मागे होता. आताची परिस्थिती पाहता दडोई उत्पन्नामध्ये सिंधुदुर्ग पुढे गेला आहे. जिल्ह्यातील एक तृतीयांश जमीन शेती बागायती खाली आहे. परंतु दोन तृतीयांश जमीन पडीक आहे. पडीक जमिनीचा वापर करून उद्योजकांनी केरळ आसाम राज्यातील उद्योग व्यवसायाप्रमाणे उद्योग करावेत. स्वतःचे उत्पन्न वाढविताना येथील उद्योग व्यवसायाला चालना देऊन सिंधुदुर्ग जिल्हा श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन यानिमित्ताने नारायण राणे यांनी केले.

मी राजकारणात असलो तरी सन 91 पासून माझा सुरू केलेला साधा हॉटेल व्यवसाय आता पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोचविला आहे. माझे स्वतःचे व्यवसाय सांभाळत असतानाही या जिल्ह्यातील नागरिकांनी मला प्रेम दिले, आदर केला राजकारणात विविध पदावर काम करण्याची मला प्रेरणा दिली याच कृतज्ञतेच्या भावनेतून पुण्या मुंबईसारख्या शहरात हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, इंजिनियर कॉलेज सुरु न करता या जिल्ह्यात सुरू करून जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपण मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यात एकाच वेळी 28 ब्रिज निर्माण करून नागरिकांची मोठी व्यवसाय दूर केली होती, हा जिल्हा कायमचा टँकर मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील धरणांवर विशेष लक्ष देत ती कामे पूर्ण झाली व हा जिल्हा कायमचा टँकर मुक्त केला. हे या जिल्ह्यातील नागरिकांसाठी मी केलेले काम आहे. असेही नारायण राणे म्हणाले.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतात व माझ्यावर टीका टिपणी करून जातात पण त्याने या जिल्ह्यासाठी काय केले! जिल्ह्याच्या विकासासाठी काय धोरण राबविले ते त्यांनी सांगावे! भास्कर जाधव सारखे भाडोत्री माणसे आणून टीका करणे म्हणजे मर्दानगी नव्हे! भास्कर जाधव जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसे मागितले व त्यावेळी मी त्यांना पंधरा लाख दिले तेही त्यांनी मला परत न करता माझ्यावरच टीका करणे हे अति झाले आहे. त्याचा बंदोबस्त आपण करूच असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

खादी ग्रामोद्योग मुख्य कार्यकारी अधिकारी नितिनजी कुमार म्हणाले देशातील अनेक भागातील उद्योगाप्रमाणे सिंधुर्गातही स्थानिक उत्पादनांवर मोठे उद्योग उभे राहू शकतात, या जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योग कुकूटपालन आंबा काजू बांबू प्रक्रिया उद्योगाला वाव आहे त्याशिवाय कौशल्यपूर्ण विकासालाही संधी आहे असे ते म्हणाले

जिल्ह्यातील फळ प्रक्रिया, अगरबत्ती उद्योग, चर्मोद्योग बचत गटांचे उद्योग यांना चालना देण्यासाठी खादी ग्रामोद्योग या मार्फत टूलकिट मशीनचे वाटप अनेक गटांसाठी करण्यात आले. विजय केनवडेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या काळात सिंदूर जिल्ह्यात झालेले रोजगार निर्मिती व त्यानिमित्ताने सिंदूर जिल्ह्याने केलेली प्रगती नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात झालेले वाढ रोजगाराच्या मिळालेल्या संधी याबाबत आकडेवारी सह माहिती दिली. सूत्रसंचालन मिलिंद परब यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, उद्योजक, अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते

 डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी नॅसकॉम ; नारायण राणे यांनी केले कौतुक

नॅसकॉम फाउंडेशनने केलेल्या कामाचे कौतुक ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. सीनियर संचालक डॉ. चेतन सामंत यांनी या जिल्ह्यातील उद्योजकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या प्रशिक्षणाची माहिती दिली. जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची फार मोठी मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फेसबुक व्हाट्सअप या सुविधा हाताळणारे तांत्रिक अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार ही नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला.