विज्ञान प्रदर्शनातून भविष्यात देशाला चांगले वैज्ञानिक मिळतील : दीपक केसरकर

राज्यभरातून आलेल्या मुलांचे आदरातिथ्य कोकणी जनतेने राखावे : दीपक केसरकर

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्गतील मुलं हुशार आहे‌. त्यामुळे आज राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सावंतवाडीत आयोजित केले आहे‌. महाराष्ट्रातील मुलांमध्ये हुशारी असल्यानं त्यांना सिंधुदुर्गच वैभव पहाता यावं यासाठी हा सोहळा कोकणात आयोजित केला आहे. नक्कीच भविष्यात देशाला चांगले वैज्ञानिक इथून मिळतील असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला‌. विज्ञान प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद दरम्यान, राज्यभरातून आलेल्या मुलांचे आदरातिथ्य कोकणी जनतेने राखावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिक्षण विभाग व भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोसले यांनी या प्रदर्शनासाठी मेहनत घेतली असून त्यामुळेच आज हा भव्य सोहळा होऊ शकला असे ते म्हणाले. आज नळपाणी योजना व माजगाव येथील धरणाचा शुभारंभ झाला. लवकरच केसरी फणसवडे येथे देखील असा प्रकल्प होत आहे. विकासासाठी १५० कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या मतदारसंघासाठी दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.