मालवणातील विकास कामांसाठी 12 कोटी निधी मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर 

मालवण | प्रतिनिधि : केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनाच्या वतीने मालवण तालुक्यात सुमारे 12 कोटी निधीतुन विविध विकासकामे मंजूर झाली आहेत.

 

किल्ले मालवण येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, सोलर लाईट बसविणे, LED स्ट्रीट लाईट बसविणे.

– १ कोटी ७ लाख

 

कोकण आपत्ती सौमिकरण प्रकल्पा अंतर्गत वरची देवली हडी, कांदळगाव, वायंगणी, हिर्ले, शिवापूर, भगवंतगड, ‘तेरई भगवंतगड, आचरा देऊळवाडा, आडारी, न्हीवे खारभूमी येथे खारभूमी योजना राबविणे.

– ७ कोटी ८० लाख

 

देव दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिर दरम्यान संरक्षक भिंत बांधणे.

– १ कोटी ६० लाख

 

 

मालवण देवबाग तारकर्ली परुळे इ. जि. मा. ५१ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.

– १ कोटी ५० लाख

 

अश्या स्वरूपात निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.