तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अनुष्का घाणेकर हीच नेत्र दीपक यश

गुहागर : जिल्हा परिषद रत्नागिरी आणि शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर आयोजित गुहागर तालुक्यात गुहागर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2023 – 24 स्पर्धेत कु. अनुष्का प्रकाश घाणेकर ( मोठा गट ) जिल्हा परिषद शाळा तवसाळ तांबडवाडी गुहागर रत्नागिरी हीने उंच उडी मोठा गट मुली या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.

 

तिचे पुढील 15 व 16 फेब्रुवारी रोजी डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून तेथे ती उंच उडी या क्रीडा प्रकारात गुहागर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिने या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मोहिते, सहशिक्षिका तनुजा गडदे, राजेश्वरी वेल्हाळ, शा. व्य. समिती अध्यक्ष रमेश कुठरे, उपाध्यक्ष सौ वैष्णवी निवाते, शिक्षणप्रेमी विजय मोहिते, माजी सरपंच नम्रता निवाते, गावचे समस्त ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांना दिले आहे.