परुळे आदिनारायण मंदिर ते हादगे घोगळेवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ..

परुळे | वार्ताहर : परुळे आदिनारायण मंदिर ते हादगे घोगळेवाडी रस्त्याला डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ सरपंच प्रणिती आंबडपालकर यांच्या हस्ते करण्यात आला. सदर रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाख व जिल्हा नियोजन निधीतून ५ लाख रुपयाचा व निधी मंजूर आहे.

सदर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, ग्रा.पं. सदस्य पुनम परुळेकर, माजी सरपंच पुषोतम प्रभु, मोहन वाड्येकर, बाबी घोगळे उदय घोगळे, राजन घोगळे, संजय कुंभार, रुपेश हादगे, बाबूराव परब, संजय तोरसकर, तन्मय घोगळे, राघो तोरसकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सदर रस्ता डांबरीकरण होण्यासाठी बऱ्याचदिवसांची ग्रामस्थांची मागणी होती ती या माध्यमातून पूर्ण झाली आहे. उर्वरित रस्त्यासाठी आणखी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन माजी सभापती निलेश सामंत यांनी ग्रामस्थांना दिले.