लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आरगाव येथील श्री गणेश नवतरुण सेवा ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजित माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून हा सोहळा दिनांक १३ फेब्रुवारी या कालावधी पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
या गणेशोत्सव अंतर्गत आज सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी सकाळी गणेशपूजन त्यानंतर ब्राह्मणदेव अभिषेक, हरिपाठ असे कार्यक्रम पार पडले.
मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत श्रींचा अभिषेक व पूजा, त्यानंतर पहाटे ५ ते दुपारी १२ या वेळेत ह. भ. प. भरत मोरे (आळजापूर, जि. सोलापूर) यांचे जन्माचे कीर्तन, दुपारी १२ वाजता जन्मोत्सव दुपारी १.३० ते ३ या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे .त्यानंतर ३.३० वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा, ५.३० वाजता भजन, सायंकाळी ६.३० वाजता दीपप्रज्वलन आणि पालखी मिरवणूक तर रात्री ९.०० वाजता पंगत असे कार्यक्रम होणार आहेत











