मुलांमधील रक्तक्षय आजार रोखण्याचा प्रयत्न!
सिंधुनगरी | प्रतिनिधी
लहान मुलांमधील रक्तक्षयाचा आजार कमी करण्यासाठी जंतनाशक गोळी खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्हा आरोग्य विभागाने हाती घेतल्या आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील 1,38,493 मुले असून अंगणवाड्या शाळा महाविद्यालय या सर्वच ठिकाणी उद्या 13 फेब्रुवारी रोजी दुपारच्या जेवणानंतर जंतनाशक गोळी मुलांना खाऊ घातली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी जिल्हाधिकाऱ्यांसोबत असलेल्या बैठकीमुळे हजर राहू शकत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे. यासाठी शासनही आवश्यक ते प्रयत्न करत आहे. शासनाकडून वर्षभरात दोन वेळा जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप केली जाणार असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर या दिवशी जी मुल गैरहजर राहणार त्यांना २० फेब्रुवारी रोजी ही गोळी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. कर्तस्कर म्हणाले की, जंतामुळे मुलांमध्ये ॲनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार मळमळ, भूक मंदावणे, आतड्यावर सूज येणे आदी आजार डोके वर काढतात. त्यामुळे १ ते १९ वर्षे वयोगटातील प्रत्येकाला वर्षातून दोनवेळा जंतनाशक गोळी देण्याची मोहीम शासनामार्फत दोनवेळा ही मोहीम राबविली जाते. यावर्षीची पहिल्या टप्प्यातील जंतनाशक गोळी वाटप मोहीम १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप मोहिमेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत.
१ ते १९ वयोगटातील प्रत्येकाने वर्षातून दोनदा घ्यायला हवी जंतनाशक गोळी
जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे शासनमार्फत फेब्रुवारी आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यात या गोळ्या वाटप केल्या जातात.
या वर्षात एक लाख मुलांना गोळ्यांचे वाटप
जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप होणार असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९८ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. १ ते २ वयोगटातील मुलांना अर्धी पाण्यातून, ३ ते ६ वयोगटातील मुलांना अर्धी चावून खाण्यासाठी तर ७ ते १९ वयोगटातील मुलांना पूर्ण गोळी दिली जाणार आहे.












