एक्झॉटिक फ्रुटस प्रा. लिमिटेड, रत्नागिरी यांच्यातर्फे शाश्वत हापूस आंबा उत्पादन तंत्रज्ञानयावर “चर्चासत्र” संपन्न

 

रत्नागिरी : एक्झॉटिक फ्रुटस प्रा. लिमिटेड, रत्नागिरी यांनी माटे सभागृह, कापसाळ- चिपळूण येथे शाश्वत हापूस आंबा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाची सुरुवात श्री बाहेती साहेब (महा व्यवस्थापक- एक्झॉटिक फ्रुटस प्रा. लिमिटेड, रत्नागिरी) यांनी दीपप्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार करून केली. या चर्चासत्रात पाटण, गुहागर, दापोली व रत्नागिरी मधून २०० हुन अधिक शेतकरी, बागायतदार व आंबा पुरवठादार उपस्थित होते. चर्चासत्रा साठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र ही (निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ, IIHR, बंगळुरू), डॉ. वैभव शिंदे (सहसंचालक प्रशासक, महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषद, पुणे) व श्री. मिलिंद जोशी (उप सरव्यवस्थापक, पणन मंडळ, रत्नागिरी) उपस्ति होते. डॉ. रवींद्र सरांनी आंब्यातील साका आणि आंब्याचे आरोग्स व्यवस्थापन या विषयावर सखोल माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचवली व हि माहिती सगळ्या शेतकऱ्या पर्यंत पोहोचावी व आपला कोंकण साका मुक्त व्हावा ही अपेक्षा केली. नंतरच्या भागात डॉ. शिंदे सरांनी विद्यापीठाचा पंचसुत्री कार्यक्रम कसा ठोसपणे राभवता येईल त्या साठी योग्स मार्गदर्शन केले व शेवटच्या सत्रात श्री. मिलिंद जोशी सरांनी आंब्याची तोड झाल्पा नंतर आंब्याचा व्यवस्थापन व त्याच विपणन कस करता येईल याची माहिती दिली. पाटण सातारा मधून कृषी उत्पन्न बाजार समिती, पाटण याचे सचिव श्री हरीश सूर्यवंशी व त्यांच्या सोबत १२ ५ शेतकरी उपस्तिथ होते, तसेच दापोलीचे प्रसिद्ध आंबा व्यावसायिक व विद्यमान नगरसेवक श्री. अन्वर रखांगे, ‘टेक्नो सर्व’ या सल्लागार कंपनी चे प्रमुख श्री. जगन्नाथ पाटील व त्यांच्याशी निगडित असलेले शेतकरी व व्यापाऱ्यांनी ह्या सत्राचा लाभ घेतला असेच लोकोपयोगी कार्यक्रम यापुढेही व्हावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. श्री. ओंकार भिंगार्डे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.