बेंगलोर येथील एक्सपोजर व्हीजिट साठी ‘ या ‘ २० विद्यार्थ्यांची निवड!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०२३-२४ या उपक्रमांतर्गत एक्सपोजर व्हीजिट आऊट साईड स्टेट या सहलीसाठी सिंधुदुर्ग मधील जिल्ह्या परिषद शाळा मधील २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत झालेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहे.

त्यांना प्रोत्साहन व बक्षीस देण्यासाठी इतर राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी प्रस्तावित केले आहे. सदर सहल २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीमध्ये कर्नाटक – बेंगलोर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातून केतकी विनायक माळकर, क्षिती विक्रम सावंत तर दोडामार्ग मधून प्रथमेश दळवी, दिपाली भंणगे. कणकवली तालुक्यातून राहत फातिमा सारंग, गाथा अमोल कांबळे, सिद्धेश चव्हाण, साक्षात समीर सावंत तर कुडाळ तालुक्यातून राजाराम गावडे, मयुरेश भोई, तेजू घाडी यांची तर मालवण तालुक्यातून मृणाल विठ्ठल धुरी, यशश्री गुरुनाथ ताम्हणकर यांची निवड झाली आहे. सावंतवाडी मधून भदू परब, ध्रुवी वेदरे, अक्षरा राऊळ यांची तर वैभववाडी मधून अवधूत आमबुसकर, दीप्ती सुतार आणि वेंगुर्ले तालुक्यातून प्रतीक नाईक, साक्षी मोहन दळवी यांची निवड झाली आहे.