आंबोली घाटातील दरीत आयशर टेम्पो कोसळला

चालकाला वाचविण्यात यश

आंबोली । प्रतिनिधी : आंबोली घाटातील एका धाकादायक वळणावरती गाडीवरील ताबा सुटल्याने पशुखाद्य वाहतूक करणारा आयशर टेम्पो जवळपास ५० फूट खोल दरीमध्ये कोसळला याबाबतची माहिती पहाटे चार वाजताच्या सुमारास आंबोली पोलीस स्थानकाला मिळाल्यानंतर तात्काळ आंबोली पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले व गाडीमध्ये अडकलेला चालक रमेश माने ( २४) याला सुखरूप बाहेर काढले रमेश माने याला दुखापत झालेली असल्याने त्याला प्राथमिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. झाडाझुडपांमुळे मोठा अपघात उडवला नाही अन्यथा जीवित आणि होऊ शकली असती असे यावेळी जाणकारांनी सांगितले अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.