▪️हिंदळे वाचनालय येथे जागतिक पुस्तक दिन उत्साहात संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून हिंदळे ग्रामोन्नती मंडळ वाचनालय हिंदळे येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासकीय अनुदान सन 2025-26 मधून खरेदी केलेली पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली होती.प्रदर्शनाचे उदघाट्न हिंदळे भंडारवाडा शाळा मुख्याध्यापिका सौ.भक्ती चव्हाण यानी केले. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली तेली आणि विध्यार्थी उपस्थित होते. प्रदर्शनात कथा, कादंबरी, चरित्र, नाट्य, धार्मिक, प्रवास वर्णन, इतिहास ग्रंथ, शिशु कथा आदी पुस्तके मांडण्यात आली होती. ग्रंथपाल सौ मिताली हिर्लेकर यानी उपस्थिताना पुस्तकांचे जीवनातील महत्व विषद करताना, ग्रंथ हेच आपले खरे गुरु आणि मार्गदर्शक आहेत. वाचनामुळे केवळ ज्ञान मिळत नाही, तर विचारांना नवी दिशा आणि मनाला उभारी मिळते. आजच्या या पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण साहित्याच्या अथांग विश्वात डोकावून पाहूया आणि वाचनाची ही समृद्ध परंपरा जोपासण्याचा संकल्प करूया असे
मार्गदर्शन केले. सिद्धकला भजन मंडळाच्या सदस्यांनी प्रदर्शनास भेट दिली. पुस्तक दीना निमित्त दिवसभर चैतन्याचे वातावरण होते. वाचनालय संचालक मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. जि प सदस्य सुनिल पारकर, सरपंच मकरंद शिंदे, संतोष आचरेकर, दयानंद तेली, परेश खोत, अब्दुल गफुर आगा, मनोज जाधव, सुधीर पारकर, अनिरुद्ध अभ्यंकर, किरण हळदणकर, मंगेश हिर्लेकर, योगेश पाटील, मंगेश मयेकर, मनोहर मोदी, ग्रामस्थ दत्तात्रय परब, श्री राणे, विजय गोरे, सौ पारकर, सौ बोरकर आदी उपस्थित होते. बाल वाड:मयाचे उदघाट्न कु. ध्रुवी हिर्लेकर हिने केले. वाचनालयाच्या या उपक्रमाचे मान्यवरानी कौतुक केले.












