मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कार्यकारणी व लोकल कमिटी मसुरे यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीपरीक्षेतील यशाचा मार्ग सुलभ करण्यासाठी जिल्ह्यातील नामवंत तज्ञ शिक्षकांकडून विनामूल्य मार्गदर्शन तालुकास्तरीय कार्यशाळा आर. पी. बागवे हायस्कुल मसूरे येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये मालवण तालुक्यातील विविध शाळांचे इयत्ता दहावीतील विद्यार्थी सहभागी झाले असून या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यशाळेला कळसुली हायस्कूलचे सी. जी. चव्हाण, सौ चव्हाण मॅडम, भगवती हायस्कूल मुणगेचे प्रसाद बागवे, विद्या मंदिर हायस्कूल कणकवलीचे पृथ्वीराज बर्डे, न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे संगम चव्हाण आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या वतीने सर्व मान्यवर मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष श्री उत्तम राणे, खजिनदार संजय बागवे, प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे, देऊळवाडा प्रशालेचे मुख्याध्यापक एस. आर. कांबळे, डी. पी.पेडणेकर, भानुदास परब, समीर नाईक, लोकल कमिटी सदस्य दत्तप्रसाद पेडणेकर, पंडित नाचणकर, इरफान शेख, रमेश पाताडे, नीता सावंत, अनिल मेस्त्री, भरत ठाकूर, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर,विशाखा जाधव, विवा तळाशीलकर, आर्या भोगले,चरणदास फुकट संस्था सदस्य, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मालवण तालुक्यातील इयत्ता दहावीतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष उत्तम राणे आणि खजिनदार संजय बागवे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना या उपक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुयोग्य असे नियोजन मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई आणि लोकल कमिटी मसुरे तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक मुळीक परब सचिव प्रसाद बागवे लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं आहे. या कार्यशाळेमध्ये बोर्ड परीक्षेचा अनुभव असलेल्या आदर्श शिक्षकांकडून थेट मार्गदर्शन तसेच विषयनिहाय मार्गदर्शन करण्यात आले. गणित विज्ञान आणि इंग्रजी यासारख्या विषयाच्या सोप्या व प्रभावी अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन, उत्तर पत्रिका ठराविक वेळेत कशी पूर्ण करावी याचे शास्त्रशुद्ध तंत्र, तणावमुक्ती परीक्षेची भीती कमी करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन, शंका निरासन, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची शिक्षकांकडून थेट उत्तरे आणि सोप्या पद्धतीने प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवाव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.












