त्या अज्ञात कारने पादचारी तरुणाचे आयुष्य केले उध्वस्त… हातखंबा तिठा येथे काय झाले पहा…

crime
Google search engine
Google search engine

रत्नागिरी | प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे अज्ञात कारची धडक बसल्याने तरुणाला आपला पाय गमवावा लागला.अपघाताची ही घटना गुरुवार 2 मार्च रोजी रात्री 7.45 वा.सुमारास घडली आहे.

प्रविण प्रशांत होरंबे (35,रा.पानवल,रत्नागिरी) असे पाय गमवावा लागलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री प्रविण होरंबे हा रस्त्याने चालत आपल्या घरी जात होता.त्याचवेळी अज्ञात कारने प्रविणला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती कि,त्यामुळे प्रविणच्या पायाचे दोन तुकडे झाले.या अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने प्रविणल तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान,अज्ञात वाहनाने प्रविणला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढलेला असून ग्रामीण पोलिस त्याचा शोध घेत आहेत.