मंडणगड: १८ वर्षीय तरुणीची काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

मंडणगड:
तालुक्यातील पालवणी चेकपोस्ट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.

ऐश्वर्या किसन पवार (वय १८, मूळ रा. यड्रामी, जि. कलबुर्गी, कर्नाटक; सध्या रा. पालवणी फाटा, मंडणगड) असे मृत तरुणीचे नाव आहे. ऐश्वर्या ही १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता आपल्या राहत्या घरातून निघून गेली होती. त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलजवळ असलेल्या एका काजूच्या झाडाच्या फांदीला तिने आपल्या ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (बी.एन.एस.एस. १९४) म्हणून करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.