नांदोस येथील राजाराम गावडे यांचे निधन

मालवण | प्रतिनिधी : नांदोस येथील राजाराम गोविंद गावडे (वय ६७) नुकतेच निधन झाले. दुर्मिळ अशा बाॅम्बे ब्लड ग्रुपची आवश्यकता असणारे राजाराम गोविंद गावडे यांना सव्वा तीन वर्षात ३८ बॅग उपलब्ध करून देण्यात आले होते. राजाराम गावडे यांच्या निधनानंतर सिंधुरक्त मित्र संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अशी माहिती संस्थापक सचिव किशोर नाचणोलकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश तेंडूलकर यांनी दिली.

राजाराम गावडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. बाॅम्बे ब्लड दुर्मिळ आहे त्या गटाचा शोध घेत राजाराम गावडे (नांदोस) यांना डायलेसिस साठी तब्बल ३८ वेळा उपलब्ध करून दिले. त्यासाठी सचिव किशोर नाचणोलकर यांनी विशेष मेहनत घेतली. दुर्मिळ गट शोध सिंधुमित्र रक्त संघटनेच्या माध्यमातून घेऊन रूग्णांना उपलब्ध करून देण्यात आले. मात्र राजाराम गावे यांचे अखेर निधन झाले.