अमरक्रांती कला पथक” कोल्हापुर यांचे ‘पोवाडा’ सादरीकरण
कलंबिस्त । प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ आयोजीत १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचे औचीत्य साधुन कोल्हापुर येथील ” अमरक्रांती कला पथक “यांचा ” पोवाडा ” सादर करण्यात येणार आहे.
१९ फेब्रुवारी रोजी होणारा शिवजयंती उत्सव हा शिवमय व्हावा या उद्देशाने सकाळी ९ वाजता महाराजांच्या मुर्तिचे पुजन, सकाळी ९.३० वाजता दर्शन व तिर्थप्रसाद, स. १० वाजता “अमरक्रांती कलापथक “कोल्हापुर यांचे (पोवाडा ) सादरी करण, दुपारी १२.३० वा.महाराजांची आरती, दु.१ वा.महाप्रसाद,दु. ३ वाजता हभप संदेश गोसावी यांची किर्तन सेवा “पावन खिंडीचा रणसंग्राम ” सांय ५ वा. भजन सेवा शिवस्वराज्य मित्रमंडळ ,सांय. ६ वाजता उत्तर पुजा व समारोप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भावीकांनी व शिवभक्तांनी तिर्थ प्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ यांनी केले आहे.











