आयुष्यमान भारत योजनेत सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली माहिती

सिंधुदुर्गनगरी : आरोग्य सेवेचा लाभ दिल्या जाणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य सारख्या योजनाचा लाभ आता आयुष्मान योजनेमधूनच एकत्रितपणे दिला जाणार आहे ही आयुष्यमान योजना राबविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून जिल्ह्यातील पाच हजार लोकांनी साडेपाच कोटी रुपयाचा योजनेचा लाभ घेतला आहे आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्राोत्सवात प्रसादरूपी आयुष्यमानचे कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या सोबत आयुष्यमान योजनेचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी या योजनेचे जिल्हा सन्मवयक अभय देसाई,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी उपस्थित होते.

आयुष्यमान भारत मिशनचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय सक्षमपणे राबविले जात आहे आयुष्यमान कार्ड काढण्याचे काम राज्यात ३९ टक्के पर्यत झालेले आहे मात्र ६० टक्के पर्यत काम झालेला सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे त्यामुळे राज्यात पहिल्या क्रमांकावर हा जिल्हा आहे लवकरात लवकर सिंधुदुर्ग जिल्हा शंभर टक्के आयुषमान कार्ड काढून देणारा जिल्हा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी कार्ड काढून देण्याची जास्तीत जास्त मदत केंद्रे सुरु करण्याची सुविधा सुरु केली जाणार आहे विशेषतः जिल्ह्यात मोठ्या स्वरूपात भरणाऱ्या आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्राोत्सवात प्रसादरूपी आयुष्यमानचे कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती डॉ शेटे यांनी दिली. आयुष्यमान भारत योजनेचा लाभही चांगल्या प्रकारे घेतला जात आहे जिल्ह्यात ६ लाख ६२ हजार ९४ लोकांचे आयुषमान कार्ड काढले जाणार आहे आतापर्यत ३ लाख ९७ हजार ४४५ लोकांचे कार्ड काढण्यात आले असून आतापर्यत ५ हजार १२२ लोकांनी ५ ,कोटी ६३ लाखाचा लाभ आयुष्यमान योजनेखाली घेतला आहे अशी माहिती देण्यात आली जिल्ह्यात सक्षमपणे राबविल्या जाणाऱ्या योजनेचा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार असे सांगत डॉ शेटे यांनी आरोग्य यंत्रणाचे कौतुक केले.

आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळण्याच्या योजनेमध्ये केशरी,व पिवळ्या रेशनकार्ड धारकांचाच समावेश होता आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांचा समावेश केला आहे त्यामुळे पांढऱ्या रेशनकार्ड धरकांनाही आयुष्यमान मिशन योजनेतर्गत पाच लाखापर्यतचे मोफत उपचार घेता येणार आहेत शासकीय मेडिकल कॉलेज मधेही याचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यात ११ ठिकाणी आयुष्यमानचा लाभ घेण्याची सुविधा सुरु केली असून त्यात ७ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे त्याच बरोबर आता बेळगाव येथील केएलई रुग्णलयातही आयुष्यमान योजनाचा लाभ घेता येणार आहे बाल स्वास्थ्य केंद्रातर्गत बालकासाठीही लाभ दिले जाणार आहेत असे स्पष्ट करण्यात आले.

आयुष्यमान भारत मिशन प्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतूनही लोकांना मोफत उपचाराचा लाभ दिला जातो तसेंच अजूनही काही योजना मार्फत मोफत उपचाराचा लाभ दिला जातो या सर्व योजना आयुष्यमान योजनेमध्ये एकत्रित करून योजना राबविली जाणार आहे अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितिचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी दिली आहे.

दरम्यान आज आयुष्यमान मिशन योजनेचा आढावा आरोग्य अधिकाऱ्या सोबत घेण्यात आला त्यामध्ये काही सूचना आल्या आहेत तसेंच खाजगी डॉक्टर यांच्यासोबतही चर्चा झाली त्यानीही काही सूचना केल्या या सर्व सूचनाचा विचार करून लोकांना एक परिपूर्ण , त्रुटी नसलेली योजना राबविण्यात येईल असे डॉ शेटे स्पष्ट केले तसेंच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी महत्वाची एक सूचना केली आहे ती म्हणजे ३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे त्यासोबतच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याची मोहीम राबविण्यात यावी अशी चांगली सूचना केली आहे या सूचनेचा विचार करून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही सांगितले.