गुहागर l प्रतिनिधी :भाजप नेते निलेश राणे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या शृंगारतळी येथील सभेने गुहागर भाजपमध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे.
आजपर्यंत भास्कर जाधव यांनी याठिकाणी अनेक वेळा भाजपवर तसेच वरिष्ठ नेत्यांवर टीका केली.मात्र त्याला भाजपकडून आक्रमक प्रत्युत्तर कधीच मिळाले नव्हते.मात्र निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांचा जाहीर सभेत समाचार घेऊन त्यांचा हिशोब चुकता केल्यानंतर आता येथील भाजपमध्ये नवे चैतन्य पसरले आहे.
निलेश राणे यांच्या जाहीर सभेत येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आणि त्यांच्या बोगस कामांचा जणू पाढाच वाचला.माजी आम डॉ विनय नातू हेदेखील या सभेत आक्रमक झालेले पहावयास मिळाले. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी निलेश राणे यांच्या सभेने गुहागर भाजपमध्ये नवी ऊर्जा भरली आहे.












