मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे कारिवणेवाडी ते आचरा पार पर्यंत जाणाऱ्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन कारिवणेवाडी फाटा येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले.
कारिवणेवाडी ते आचरा पार हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण होण्यासाठी कारिवणेवाडी ग्रामस्थांनी गेली दोन ते तीन वर्षे आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोविंद सावंत यांनी सुध्दा कारिवणेवाडी ग्रामस्थांच्या बरोबर आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे भेट घेऊन या रस्त्यासाठी आग्रह धरला होता. आचऱ्याला जाण्यासाठी हा कमी अंतराचा रस्ता आहे. सदर रस्ता मुणगे भगवती हायस्कूल तिठा ते आचरापार पर्यत सुमारे चार किलोमीटर लांबीचा असून त्यामध्ये ओहोळावरील पुल , मोऱ्या , खडीकरण व डांबरीकरण साठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडे तीन कोटी रुपयाचा निधी आमदार नितेश राणे यांनी मंजूर करून आणला आहे. भूमिपूजन प्रसंगी सरपंच सौ अंजली सावंत, शैलैश लोके, ग्रामपंचायत सदस्य सौ साक्षी गुरव, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य, संजय घाडी, देवी भगवती देवस्थान समिती सचिव निषाद परूळेकर, विश्वस्त आनंद घाडी , अनिल धुवाळी
मनोज सावंत, दिगंबर बागवे, हरी परूळेकर, संजय परुळेकर, संतोष परुळेकर, अशोक सावंत, भगवती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेश बांदेकर ,सुधीर पाडावे, सुरेद्र लब्दे, सत्यवान घाडी, दादा वळंजू, संतोष पुजारे, शैलेश राणे, कृष्णकांत गुरव, शेखर गुरव,रामतीर्थ कारेकर, तसेच कारिवणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. कारिवणेवाडी ग्रामस्थाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.











