हरकुळ येथील कुडाळदेशकर गौड ब्राम्हण समाजाचा १० वा स्नेहमेळा संपन्न
कणकवली : हरकुळ बुद्रुक येथे गेली ९ वर्षे कुडाळदेशकर गौड ब्राम्हण समाजाचे ज्ञाती बांधव-भगिनी कौटुंबिक स्नेहमेळा आयोजित करतात. यावर्षी रविवार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स्नेहमेळावा प्रभाकर महादेव सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.ज्ञातीबांधवातील स्नेह अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
प.पू.पुर्णानंद स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या स्नेहमेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला. गेली सलग ९ वर्षे कुडाळदेशकर गौड ब्राम्हण ज्ञातीबांधव एकत्र येऊन स्नेहमेळा घेत आहेत. यावर्षी १० वर्ष यावेळच्या समारंभास कुडाळदेशकर गौड ब्राम्हण ज्ञातीचे कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सामंत, डॉ.एम.डी.देसाई, शशिकांत ठाकूर गुरूजी, लक्ष्मण प्रभू, व.द.सामंत, रघुवीर सामंत, अॅड.नानू देसाई, शैलेश गो. सामंत, संतोष भि. पाटील, राजेंद्र पाटील, दिलीप सामंत, राजू आजगावकर, संतोष वायंगणकर आदी उपस्थित होते. ज्ञाती बांधवांनी या स्नेहमेळयात शुभेच्छा दिल्या. हरकुळ गावातील ज्ञातीबांधव सलग १० वर्षे एकत्र येऊन स्नेहमेळा घेतात याचेकौतुकही केलं. यावेळी कै. सौ. शालीनी मारूती सामंत यांच्या स्मरणार्थ सौ.साक्षी शैलेश सामंत यांनी हळदिकुंकू कार्यक्रमही केला. या संपूर्ण स्नेहमेळाचे सूत्रसंचालन व आभार बाबुराव सामंत यांनी केले.












