केळवली चव्हाणवाडी येथील श्री साईनाथ मंदिरात २२ ते रविवार २५ फेब्रुवारी या कालावधी श्री साई महोत्सवाचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील केळवली येथील श्री साईनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे केळवली चव्हाणवाडी येथील श्री साईनाथ मंदिरात गुरूवार २२ ते रविवार २५ फेब्रुवारी या कालावधीत श्री साई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यानिमित्ताने गुरूवार २२ रोजी श्री साईचरित्र अखंड चक्री पारायणाचा प्रारंभ, शुक्रवार २३ रोजी सकाळी ५.१५ वा. काकड आरती, ६. ०० वाजता मंगलस्नान, श्री साई चरित्र अखंड चक्री पारायण, रात्रौ ७ ते ८ धूप आरती, रात्रौ ८ ते १० वाजता जपा हरिनाम सदा भजन मंडळ मुंबईचे सुस्वर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

 

शनिवार २४ रोजी सकाळी ५.१५ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता मंगलस्नान, सकाळी १० वाजता आजी आजोबा चरण पूजन, सकाळी ११ ते दुपार १.३० वाजता होम मिनिस्टर, दुपारी १.३० ते २ वाजता बक्षीस समारंभ, दुपारी २ ते ४ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वाजता पालखी मिरवणुक, रात्रौ ७ ते ९ श्री हरी वारकरी वारकरी सांप्रदायिक मंडळ कोंडोशीचा हरिपाठ, रात्रौ ९ ते १ वाजता मोरोशी काकयेवाडी येथे सुस्वर भजन, तर रात्रौ १० वाजता जि. प. शाळा केळवली नं. २ आयोजित किलबिल धारा हा मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

 

रविवार २५ रोजी सकाळी ५.१५ वाजता काकड आरती, ६ वाजता मंगलस्नान, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता मध्यान आरती, महाप्रसाद, दुपारी ३ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते ६ वाजता पालखी दर्शन रात्रौ ७ ते ९ वाजता आदिनाथ वारकरी सांप्रदाय कुरंगवणे यांचा हरिपाठ तर रात्रौ १० वाजता मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाटय मंडळ वेंगुर्ला यांचा दशावतार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

यावेळी भाविकांनी उपस्थीत राहून दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईनाथ मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मंगेश चव्हाण सेक्रेटरी खुशीराम मोरे यांनी केले आहे.