राजापूर (वार्ताहर): येथील एस. टी. आगारातील नियंत्रण कक्षातील दुरध्वनी गेली कित्तेक दिवस बंद असल्याने एस. टी. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नियंत्रनण कक्षातील कोमात गेलेला दुरध्वनी शुध्दीवर कधी येणार याची प्रतिक्षा प्रवाशांना लागुन राहीली आहे.
राजापूर आगारातील नियंत्रण कक्षातील दुरध्वनी गेले काही महीने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवाशाना एस टी बसच्या वेळेची चौकशी करणे कठीण झाले आहे. एकाद्या गाडीच्या वेळेसंदर्भात चौकशी करण्यासाठी दुरध्वनी केल्यास तुम्ही प्रयत्न करीत असलेला दुरध्वनी क्रमांक अस्तित्वात नाही अशा सुचना ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना एस टी आगारातच जावून गाड्यांची चौकशी करावी लागत आहे. यासाठी प्रवाशांना एस् टी आगारापर्यंत जाण्याचा नाहक भूर्दंड पडत आहे. या बंद असलेल्या दुरध्वनीची तात्काळ दुरुस्ती करुन घेण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.तसेच लवकरात लवकर याची दखल न घेतल्यास एस् टी आगाराच्या वरीष्ठ पातळीवर तक्रार केली जाणार असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
————————————-











