आचार्य श्री. विद्यासागर महाराज यांना खेड मध्ये विनयांजली

खेड (प्रतिनिधी) समस्त भारताचे थोर संतशिरोमणी तपस्वी सम्राट जैन आचार्य श्री. विद्यासागर जी महाराज यांचे सल्लेखनापूर्वक मोक्षगमन झाले. पन्नास वर्षाहुन अधिक काळ पासून धर्म मार्गावर सुरू असलेली तप, त्याग , वैराग्याची यात्रा विश्राम झाली. त्यांच्या निर्वाण निमित्त खेड च्या जैन समाजातर्फे विनयांजली सभा आयोजित करण्यात आली होती.

खेड येथे झालेल्या विनयांजली सभेला सकल खेड जैन समाज अध्यक्ष रमेश जैन, विमलकुमार, उत्तम कुमार, वैभव जैन, लक्ष्मीकांत जैन, वीरेंद्र जैन,तसेच महिला जैन मंडळ च्या सर्व महिला उपस्थित होत्या .
नवकार महामंत्र लोगस पाठ मंगल पाठ उच्चारण करून आचार्य विद्यासागर महाराज यांना अभिवादन केले, आणि मोक्षप्राप्ती ची प्रार्थना केली.

जातीच्या धर्माच्या बंधना पलीकडे असलेल्या आचार्य विद्यासागर जी यांचे हिंदू , मुस्लिम , सिख, बौद्ध अगदी सर्व संप्रदाय मधील अनुयायी होते. ५६ वर्ष अनवाणी पायांनी दिगंबर अवस्थेत भारतभर लाखो किलोमिटर पदभ्रमण करत धर्मोपदेश त्यांनी दिला. तेल , मीठ , साखर , दूध , फळ , सुखामेवा इत्यादी अन्नाचा जीवनभर त्याग धारण केला होता. केवळ एकवेळ अत्यंत नीरस आहार ग्रहण त्यांची चर्या होती.. केवळ चार तासाची निद्रा हा देखील एक कठोर व्रत त्यांनी धारण केला होता. भारतातील सर्वात मोठे गो शाळेचा विस्तार त्यांनी निर्माण केला हातमाग चे पुरस्कर्ते , स्वदेशी भारत निर्माते गुरुवर्यांना विनम्र वंदन.