यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने मुणगे येथे साडी वाटप!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे आडबंदर,आपई, कारिवणे वाघोळी नगर येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक एक सदस्य सौ.रविना मालाडकर, सौ.अंजली सावंत, श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे यांच्या अथक प्रयत्नाने महिला बचत गटाच्या सदस्या, एकता ग्राम संघाचे पदाधिकारी, आशा सेविका,बचत गटाच्या सीआरपी यांना साडी वाटप करण्यात आले. सरपंच सौ. साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ, साक्षी सावंत, एकता ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ.सविता रूपे, सचिव सौ.आरती सावंत, कोषाध्यक्ष सौ. हर्षदा मुणगेकर लिपिका अनुजा कारेकर, माजी सरपंच सायली बागवे, सदाफुली बचत गटाचा अध्यक्षा सौ.देवयानी राणे,उपाध्यक्षा सौ.शोभा पाडावे माऊली बचत गटांच्या सदस्या आणि आपई वाडीतील सर्व बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.प्रत्येक वेळी नवीन नवीन सामाजिक उपक्रम राबवत प्रभागसेविका सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत,श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ. सायली बागवे यांनी सामाजिक कार्याची बांधीलकी कायम जपून ठेवली आहे असे मान्यवरांनी सांगितले. दुर्गा परब यांनी सूत्रसंचालन करत यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. आनंद मालाडकर आणि कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले.