खंडाळा l वार्ताहर : बारावीच्या परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा खंडाळा येथील पार्वती शंकर बापट जुनियर कॉलेज खंडाळा येथे होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा खंडाळा वाटद केंद्रावर सुरळीत पार पडत आहेत.
राज्यभरातून एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे. त्यापैकी पार्वतीबाई शंकर बापट जुनिअर कॉलेज केंद्र क्रमांक 671 व केंद्र क्रमांक 672 जाकादेवी दोन्ही मिळून 533 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत दोन्ही केंद्राचे काम सुरळीतपणे चालू आहे. या केंद्र कस्टडीचे परीक्षक म्हणून श्रीमती तोटावार मॅडम पाहत आहेत. तर 671 केंद्राचे केंद्रप्रमुख पोतदार सर 672 चे श्री पुजारी सर आहेत. उपपरीक्षक म्हणून श्री चव्हाण सर काम पाहत आहेत तर गंधेरे सर, कांबळे सर, केदारी सर, पाटील सर, शेंडगे सर, लाकडे सर, सुर्वे सर हे सहाय्यक परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी पोलीस संरक्षण सागरी पोलीस ठाणे जयगड पहात आहे











