वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी केले अभिनंदन
वैभववाडी l प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व करूळचे माजी सरपंच रमेश सुतार व सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांच्या उपस्थितीत येथील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला.
यावेळी जिल्हा कलाकार मानधन समितीचे सदस्य रितेश सुतार, माजी उपसभापती अंबाजी हुंबे,
श्री. रमेश सुतार यांनी करूळ येथे दहा वर्ष सरपंच पदाची धुरा सांभाळली होती. राष्ट्रीय काँग्रेसचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. प्रवेशानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
डि.के. सुतार यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणून तालुक्यात ओळख आहे. ते सडूरे गावचे रहिवासी आहेत. तालुक्यातील विविध विकास कामाबाबत त्यांनी अनेकदा आमरण उपोषणे करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना अधिक बळकट केली जाईल असे यावेळी नासीर काझी यांनी सांगितले.












