राममंदिर उभारणीसह देश व हिंदू धर्मासाठी कारसेवकांचे बहुमोल योगदान : निलेश राणे

मालवण राजकोट येथील कार्यक्रमात भाजप नेते निलेश राणे कारसेवकांसमोर नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील हिंदुत्ववादी सरकारमुळे आज देशात हिंदूमय वातावरण

अमित खोत | मालवण : कारसेवकांनी आपला देश आणि हिंदू धर्मासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. पराक्रमाचा आदर्श असलेला कारसेवकांचा त्याग विसरणे शक्य नाही. मात्र कारसेवकानी कधीही याचे श्रेय घेतले नाही. असे गौरवोद्गार भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.

माजी खासदार निलेश राणे यांनी करसेवकांचं बलिदान श्रेष्ठ असल्याच सांगत या कारसेवकांच्या सहवासात आहोत हे माझं भाग्याचं आहे अस म्हणाले. यावेळी निलेश यांनी सौरभ ताम्हणकर व मित्रमंडळानी जो कारसेवकांचा सत्कार कार्यक्रम घेतला त्याबद्दल आभार व्यक्त केले. कारसेवक ही रत्न आहेत. ही रत्न अनुभवायला मिळाली त्यांचे विचार ऐकता आले हे मी माझं भाग्य समजतो. राम मंदिर उभारण्या मागे काय काय झालं हे विचार करण्या सारखं आहे. कधी कधी वाटतं त्या युगात जन्म पाहिजे होत. आपण विचारही करू शकत नाही ते कार्य कारसेवकांनी केल मात्र मुंबईत बसून काही लोक सांगतायत कि ते आम्ही केलं. असे सांगून निलेश राणे म्हणाले, अयोध्या राम मंदिर उभारणीत कारसेवक यांचे योगदान बहुमोल आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील हिंदुत्ववादी सरकार मुळे हे सर्व शक्य झाले. अशी भावना निलेश राणे यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर आणि मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात अयोध्येतील राममंदिर उभारणीत कारसेवा बजावलेल्या कारसेवकांचा सत्कार सोहळा मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व आयोद्या येथे स्थापन करण्यात आलेल्या श्री प्रभू रामलल्ला यांची प्रतिमा निलेश राणे यांच्या हस्ते कारसेवकांना भेट देऊन सत्कार करण्यात आले.

या वेळी व्यासपीटठावर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांसह डॉ. सुभाष दिघे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, विलास हडकर, हरी चव्हाण, भाऊ सामंत, श्रीधर काळे, झुंजार हळमलकर, समिर गवाणकर, संजय गवंडी, सावित्री सत्यवान खोत व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ सुभाष दिघे यांनी कारसेवेतला प्रवास कथन करत हिंदू संघटन जे टिकले आहे ते वाढत गेलं पाहिजे. जर संपूर्ण समाज संघटित झाला तर आपल्या जवळ कोणी वाकडी नजरेने बघू शकणार नाही. हिंदू राष्ट्राचा विचार सर्वांनी पुढे न्ह्यावा असे सांगितले.

विलास हडकर यांनी आपले कारसेवेतील अनुभव सांगितले, आताची आपल्या समोर जी काही परिस्थिती आहे त्यापेक्षा विपरीत परिस्थिती अयोध्ये १९९० मध्ये होती. त्यावेळी एका अर्थाने मोगलाईचा वारसा चालवणाऱ्या मुलायम सिंगच राज्य होत. आणि प्रभू रामचंद्राच मंदिर कोणत्याही परिस्थिती उभा राहू देणार नाही हि त्यांची इच्छा होती. त्यावेळी मुख्यमंत्री असल्याच पुरेपूर फायदा ते घेत होते. २०० किलो मिटर च्या बाहेर वाहन थांबवली जात होती. रेल्वे सुद्धा बंद होती. या ठिकाणी ३० ऑक्टोबर १९९० ला करसेवक राम नामाचा जयघोष करत हजारोच्या संख्येने चालून गेले. संघर्ष झाला, अनेक करसेवक यांनी आपले प्राणहि गमावले. ५०० वर्ष पूर्वी ज्या वस्तू वरून प्रभू श्री राम मंदिरा वरून जो भगवा द्वाज खाली उतरला होता तो भगवा १९९० मध्ये प्रामुख्याने दोन करसेवक म्हणजे शरद कोठारी व त्यांचे बंधु राम कोठारी या दोघां कारसेवकांनी फडवला हि सर्वांसाठी अभिमनस्पद गोष्ट आहे. परंतु त्या मुलायम सिंगाची तळ पायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी २ नोव्हेंबरला निर्दयी असा गोळीबार केला. कोठारी बांधूच्या डोक्याला बंदूकाची नळी लावून घात केला. १९९० नंतर १९९२ साली मला पुन्हा कारसेवेत जाण्याचा योग आला व त्यावेळी हिंदुत्ववादी कल्याण सिंगाच सरकार होत. असे अनुभव हडकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास व राममंदिर उभारणीतील कारसेवकांचे योगदान या हे सर्व अंगावर रोमांच येतील असे सांगितले.

यावेळी सौरभ ताम्हणकर मित्रमंळाचे कार्यकर्ते निशय पालेकर, राकेश सामंत, जुबेर खान, कुणाल खानोलकर, फ्रँसिस फेर्नांडिस, गौरव लुडबे, लौकिक कांदळकर, तुषार वाघ यांनी या कार्यक्रम यशवी होण्यास सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अक्षय सातार्डेकर यांनी केले.

मावळा डे साजरा करूया

यावेळी निलेश राणे म्हणाले आपण सगळे डे साजरे करतो. परंतु आपण कधी मावळा डे साजरा नाही करत. तो डे साजरा केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. सोबत मावळे यांचा पराक्रम निष्ठा याचा सन्मान आपण केला पाहिजे. असेही निलेश राणे यांनी या निमित्त सांगितले.