वैभववाडी | प्रतिनिधी : थकीत वीज बीलामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तब्बल २ लाख ४५ हजार रुपये विज बिल थकीत आहे. सुमारे वर्षभर वीज बील भरले नाही. वीज वितरण कंपनीने याबाबत वारंवार सुचना करुन देखील संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका रुग्णांना बसला आहे.












