आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. राजाराम राठोड यांची नियुक्ती

 

राजापूर (वार्ताहर): येथील रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. राजाराम राठोड यांची नियुक्ती झाली असून ते महाविद्यालयात रूजू झाले आहेत.

डॉ. राठोड गेली अकरा वर्षे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर पदवी वर्गाला मराठी विषयाचे अध्यापन करीत होते. त्यांची गेली अनेक वर्षे रिक्त असलेल्या मराठे महाविद्यायाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. राठोड यांनी यापुर्वी २००५ ते २०१३ पर्यंत राजापूर येथील मराठे महाविद्यालयात पदवी मराठीचे अध्यापन केले आहे. त्याचबरोबर २०१३ ते २०२४ पर्यंत पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर पदवी वर्गाला मराठी विषयाचे अध्यापन केले आहे.

तर स्वायत्त महाविद्यालय परीक्षा नियंत्रक, मराठी अभ्यास मंडळ चेअरमन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तसेच नगर व रत्नागिरी येथील स्वायत महाविद्यालय मराठी अभ्यास मंडळ सदस्य, मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. पीएच. डी. पदवीसाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांची मराठे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.