दोघांवर गुन्हा
खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील माणी गावातील गट नं ३५३ या जमिनी मधील सुमारे ६ लाख किमतीची ३१ सागाची झाडे चोरीस गेली असून या प्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ या कालावधी मध्ये घडली
सुरेश पांडुरंग गमरे व काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला एक इसम वय सुमारे ३० वर्षे असे दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी श्री. कैलास गणपत गमरे यांनी येथिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
संशयित सुरेश पांडुरंग गमरे व अन्य एक जण याने यांनी कामगारांच्या मदतीने २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७.०० वा ते ०९. या चे मुदतीत माणी गट नं ३५३ मधील फिर्यादी यांचे मालकीचे जमिनीमध्ये फिर्यादीला न विचारता जमिनीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन सिमेट य लोखंडी जाळी, तारेचे कंपाउंड घातलेले जमिनीतुन तोडलेली ३० सागाची झाडे कामगारांच्या मदतीने मशीनच्या सहाय्याने तुकडे करुन ट्रक्टर ट्रॉलीमध्ये सागाची तोडलेली झाडे भरून चोरी करुन निघुन गेले
सदर घटनेबाबत फिर्यादीचा भाऊ बाळाराम गमरे यांना विचारणा केली असता तुझ्याशी मला बोलायचे नाही म्हणुन तो त्याचेशी काहीही बोलला नाही. परंतु त्यांचे सोबत असलेला काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला एक इसम वय सुमारे ३० वर्षे याने तुम्हांला काय करायचे ते करा असे बोलून दमदाटी केलेली आहे. तसेच फिर्यादी यांनी सुरेश पांडुरंग गमरे यांचेकडे फोनद्वारे विचारणा केली असता त्याने तु विषय वाढवलास तर तुला जड जाईल असे बोलून जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळी केलेली आहे. तसेच फिर्यादीचे मालकीचे जागेमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन टॅक्टर च कामगारांच्या साहाय्याने फिर्यादीचे मालकीचे जागेमध्ये जाण्याचा गेट तोडुन इतर झाडांची नासधुस केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे











