जनशताब्दी एक्सप्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कणकवली येथील घटना ; पोलीस घटनास्थळी दाखल

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर कणकवली नागवे येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या धडकेने अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. नागवे येथील गोटणीच्या आंब्याच्या झाडाजवळील रेल्वे ट्रॅकवर हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी ५:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाची ओळख पटलेली नाही. मृताच्या गळ्यात काळा दोरा बांधलेला आढळून आला आहे. त्याच्या अंगावर फुल पॅन्ट, पिवळसर रंगाचे फुल शर्ट, रंग काळा – सावळा आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणाचे वय साधारपणे ४० ते ४५ असण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्याजवळ रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट देखील आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

मडगाव ते मुंबई जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस खाली नागवे गाव हद्दीत ४० ते ४५ वर्षाच्या तरुणाचा अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी त्या तरुणांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे विखुरले गेले होते. जनशताब्दी एक्सप्रेसच्या चालकाने याबाबतची माहिती नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. तर नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर यांनी कणकवली स्टेशन मास्तर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. दरम्यान सायंकाळी कणकवली पोलीस नागवे रेल्वे ट्रॅक येथे जाऊन घटनेची माहिती घेत आहेत.