कणकवली : देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विस्थापित आणि नवीन कुर्ली या स्वतंत्र पुनर्वसित गावठाणात सर्व प्रकल्पग्रस्तांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांची प्रातिनिधीक संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र नवाळे तर कार्याध्यक्षपदी हरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या संघटनेची कार्यकारणी जाहीर झाली असून ती पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्षपदी पांडुरंग चव्हाण, प्रदीप कामतेकर, एकनाथ चव्हाण, सचिवपदी सुनील गोसावी, आनंद सावंत, सहसचिवपदी आशिष पेडणेकर, सत्यवान पवार, सदाशिव चव्हाण, खजिनदारपदी अनंत चव्हाण, सहखजिनदारपदी अरुण दळवी, सदस्यपदी भगवान तेली, राजेंद्र तेली, बाळकृष्ण चव्हाण, उत्तम तेली, सखाराम हुंबे, विजय परब, संतोष सुद, दाजी सुतार, सुरेंद्र पवार, महेश चव्हाण, दिलीप वैराग, शंकर राणे, प्रवीण पार्टे, दिपक शिंदे, चंद्रकांत चव्हाण, सल्लागारपदी काशिराम राणे, मधुकर परब, अनंत दळवी, जनार्दन पवार, शांताराम पार्ट, केशव दळवी, वासुदेव परब, अंकुश परब, वसंत येंडे, अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या आयोजित सभेमध्ये प्रकल्पग्रस्तांची एकता अबाधित ठेवणे, नवीन कुर्ली येथे स्वतंत्र ग्रा.पं. स्थापन करणे, प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधा पुर्ण करून घेणे. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेत जमिन मिळण्यासाठी पाठपुरावा करणे, प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी सुमारे शंभर प्रकल्पग्रस्त बंधु-भगिणी उपस्थित होते..