व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी मधील रिक्त व संस्थास्तरावरील जागांसाठी प्रवेश सुरु

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी माडखोल येथील

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी येथे तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यातर्फे सुरु – असलेली डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यानंतरच्या रिक्त राहिलेल्या व संस्थास्तरावर जागांसाठी प्रवेश देणे सुरु आहे.

सदरील महाविद्यालयामध्ये २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत डी. फार्मसीसाठी विहित नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसहित महाविद्यालयात उपस्थित राहून सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP ROUND) मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीचा फायदा घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील व प्राचार्य डॉ. शिंगाडे सर यांनी केले आहे.

Sindhudurg