रायगड | प्रतिनिधी : दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक पद्मदुर्गावर सह्याद्रि प्रतिष्ठान श्रीवर्धन विभाग आणि केंद्र पुरातत्त्व विभाग,मुंबई सर्कल अशी संयुक्त स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
गडदेवता कोटेश्वरी देवीच्या पूजेने मोहिमेची सुरूवात करण्यात आली.सदर मोहिमेत किल्ल्याच्या तटबंदी बुरुजावर वाढलेली अतिरिक्त झुडपे ही प्रस्तरारोहण साहित्य वापरून काढण्यात आली.तसेच किल्ल्यावर इतर प्लास्टिक बॉटल,सुका व ओला कचरा गोळा करून बाहेर विल्हेवाट लावण्यात आली.परमपवित्र भगवा ध्वजाला मानवंदना देण्यात आली.किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा देण्यात आले.अशी माहिती श्री.योगेश निवाते व अजिंक्य कोळंबेकर यांनी दिली.
श्री.बजरंग येलिकर सर (केंद्र पुरातत्त्व विभाग) यांची उपस्थिती लाभली.तसेच श्री.संजय भोसले,श्री.रुपेश पाटील,सौ.सानिका चोरगे(स्थानिक,एकदरा),श्री.आवेश मुंबईकर(बोट)यांचे विशेष सहकार्य लाभले. वरील मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज फ्रेम व शाळ देऊन सन्मानित करण्यात आले.सदर मोहीम ही संस्थेचे श्री.गणेश रघुविर यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झाली. गेल्या ५ वर्षांपासून संस्थेमार्फत दुर्गसंवर्धन कामे होत आहेत.सर्वात उंच भगवा ध्वज,तोफांना तोफगाडे लावण्यात आलेत.असे ऋतिक भोसले यांनी सांगितले.
या मोहिमेस सह्याद्रि ट्रेकर्स(श्रीवर्धन) वसई-विरार,दापोली,खेड,पनवेल,सातारा,भिवंडी,पुणे,अलिबाग-मुरूड या संस्थेच्या विभागातील दुर्गसेवक व दुर्गसेविकांची उपस्थिती लाभली त्यांचे श्रीवर्धन विभागाने आभार व्यक्त केले.
#श्रीवर्धन_विभाग
#सह्याद्रि_प्रतिष्ठान_हिंदुस्थान











