खेड परिट समाजातर्फे संत गाडगेबाबा जयंती

खेड(प्रतिनिधी) तालुका परीट समाज संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबा सभागृहात संत गाडगेबाबा यांची १४८ वी जयंती उत्साहात पार पडली. यानिमित्त विविधांगी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

निष्काम स्वच्छतेचे प्रथम जनक, कर्मयोगी अज्ञान अंधश्रद्धा यावर आपल्या कीर्तनातून भाष्य करून समाजास अंधश्रद्धेपासून परावृत्त करणारे महान संत गाडगेबाबा यांचे गोपाला गोपाला देवाकिंनंदन गोपाला भजन करण्यात आले.

आरक्षण समन्वय समितीचे जिल्हाप्रमुख संतोष शिंदे, लॉंड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश भोसले, तालुका संघटक मुकेश भोसले, नथुराम जांभुळकर, हरीश भोसले, खजिनदार ज्ञानेश भोसले, गौरव शिंदे अर्णव शिंदे, ऋग्वेद शिंदे, तालुका उपाध्यक्षा आरोही शिंदे, संचिता शिंदे, अपूर्वा शिंदे, आशा शिंदे उपस्थित होते. यावेळी सभागृह निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या स्थानिक पदाधिकारी व समाज बांधवांच्या तसेच ठेकेदार व शासकीय अधिकारी यांचा सन्मान

करण्यात आला. अशोक भैरवकर, साईराज खेडेकर, विनोद पाटणे, अन्वर साठी, सातपुते मलिक मुसा, अजित टाकले यांनाही सन्मानित करण्यात आले. कळंबणी येथील वारकरी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. सचिव महेश भोसले यांनी आभार मानले.