खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झालेल्या रोहा ते ठोकूरदरम्यान प्रवासी गाड्या डिझेलऐवजी विजेवर चालवण्यात येत आहेत. आतापर्यंत कोकण मार्गावरून धावणाऱ्या ३५ रेल्वेगाड्यांमधील प्रवाशाचा प्रवास प्रदूषणमुक्त व त्या सोबत वेगवान देखील झाला आहे.
प्रदूषण टाळण्यास रेल्वेगाडीला डिझेल (लोको जोडण्याच्या कटकटीतून कायमस्वरूपी
मुक्त करण्यासाठी २०१५ पासून रोहा ते ठोकूरदरम्यान ५ टप्प्यात विद्युतीकरणाचे काम हाती घेत पूर्ण करण्यात आले होते. मात्र उपरेल्वेस्थानकांची कामे
प्रलंबित राहिल्याने प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याच्या नियोजनात लांबणीवर पडले होते या मुळे २०२२ या आर्थिक वर्षात हे नियोजन अखेर मार्गी लागले रत्नागिरी येथील ट्रॅक्शन उपरेल्वेस्थानक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कोकण मार्गावरील रेल्वेगाड्या डिझेलऐवजी विद्युतशक्तीवर चालवण्याचा निर्णय घेतला
जानेवारी २०२२ पासून सर्वप्रथम कोकणवासियांच्या हक्काची अन् नियमितपणे हाऊसफुल्ल धावणारी दिवा- रत्नागिरी पॅसेंजर डिझेलऐवजी विजेवर धावू लागताच प्रवास प्रदूषणमुक्त अनू वेगवान झाल्याने झाला यानंतर टप्याटप्याने रेल्वेगाड्या विद्युतशक्तीवर चालवण्याचे नियोजन रेल्वेप्रशासनाने केले. त्यानुसार २० सप्टेंबरपासून नेत्रावती एक्सप्रेसचा प्रवासही विद्युत इंजिनावर सुरू झाला. यापाठोपाठ गरीब रथ मंगला एक्सप्रेस,
राजधानी एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस कोच्चुवेली- इंदोर साप्ताहिक एक्सप्रेस, भावनगर कोच्युवेली एक्सप्रेस गांधीधाम- तिरुनेलवेली एक्सप्रेस, हापा मडगाव एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक एक्सप्रेस आलिशान तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- कोच्चुवेली साप्ताहिक एक्सप्रेस आदी गाड्याही डिझेलऐवजी विजेवर धावू लागल्या.
कोकण मार्गावरून डिझेलवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यामुळे रेलवे प्रशासनाला दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा खर्च करावा लागत होता. ही तूट भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्या डिझेलऐवजी विद्युत इंजिनावर चालवण्यास सुरुवात केल्यापासून दरवर्षी खर्चाचीही बचत होत आहे.











