टीबी आजार रोखण्यासाठी आता प्रतिबंधक लस ही देणार!
सिंधुनगरी | प्रतिनिधी : टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात सिंधुर्गातील ग्रामपंचायतीने चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल 73 ग्रामपंचायती या अभियानाच्या पात्रता फेरीत निवडल्या गेल्या असून सहा निकषांच्या आधारे पडताळणीचे काम सुरू झाले आहे. पडताळणी पूर्ण होताच टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतींच्या सन्मान होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
दरम्यान टीबीचे प्रमाण कमी व टीबी रोगाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात फि लस हाय रिस्क वयोगटाला दिली जाणार आहे. ज्या कुटुंबात टीबी चा रुग्ण आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य क्रमाने ही लस दिली जाणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त होतात ही लस नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहे असेही डॉ. सई धुरी यांनी सांगितले.
टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात सानिकशासन हजार लोकसंख्येमागे एक टीबी रुग्ण, हजार लोकसंख्येमागे तीस संशयित रुग्णांची तपासणी गावातील नागरिकांचा सहभाग, रुग्णांचा उपचार पद्धतीत सहभाग अशा सहा निकषांच्या आधारे टीबी मुक्त गाव जाहीर होणार आहे. अशी माहिती डॉक्टर हर्षल जाधव यांनी दिली.
जिल्ह्यात पूर्वीचे 1100 टीबी रुग्ण असून यावर्षी 819 रुग्णांची भर पडली आहे. या सर्व रुग्णांना मोफत औषध उपचार चालू असून त्यांना आरोग्य सुविधा पुरविली जात आहे. टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात लोक सहभाग घेऊन जनजागृती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या गावांची 29 पडताळणी पूर्ण करून टीबी मुक्त गाव म्हणून या गावांना अवार्ड मिळणार आहे. असेही हर्षल जाधव यांनी सांगितले.










