सिंधुर्गातील 34901 बालकांना पोलिओ डोस पाजणार : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी
सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मार्च 2024 रोजी पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील 34901 बालकांना पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. जिल्ह्यातील 907 लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालय सिंधू नगरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सई धुरी यांनी पल्स पोलिओ बाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी डॉक्टर उमेश पाटील डॉक्टर हर्षल जाधव उपस्थित होते. 13 जानेवारी 2011 नंतर पोलिओ रुग्ण देशात सापडला नाही त्यामुळे दोन सन 2014 मधें आपला देश पोलिओमुक्त झाल्याचे जाहीर झाले होते. सन 2022 मध्ये पच पोलिओ मोहीम राबविण्यात आले होते. त्यानंतर आता तीन मार्च रोजी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पल्स पोलिओ हा राष्ट्रीय कार्यक्रम असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार हा कार्यक्रम देशात एकाच वेळी राबविण्यात येतो. जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वी राबविल्या जावा यासाठी आरोग्य विभागाची 909 पथके या काळात काम करणार आहेत. जिल्ह्यात 2 05 024 एवढ्या घराला भेट देऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी आठ ते पाच या वेळात हे लसीकरण होणार आहे. एसटी स्टँड रेल्वे स्थानके यात्रा ठिकाणी विमानतळ टोलनाके इत्यादी ठिकाणी येणाऱ्या बालकांना लसीकरणासाठी 40 पथके काम करणार आहेत. तर मजूर वस्त्या खाणी इत्यादी वस्त्यांच्या ठिकाणी ऐसी पतके काम करणार आहेत.
जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समन्वय समितीची बैठक झाली आहे. व त्या दृष्टीने चांगले नियोजन करण्यात आले आहे असे हे डॉक्टर सई धुरी यांनी माहिती दिली.
आशा स्वयंसहायकानी सहभागी व्हावे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आशा महिलांनी आरोग्य सुविधा ला बळकटी देण्यासाठी चांगले काम केले होते. पल्स पोलिओ कार्यक्रमातही त्यांचे मोलाचे सहकार्य असे. आता अशा संपात असून या मोहीम काळात त्यांची उणीव भासणारी आहे. पल्स पोलिओ कार्यक्रमात त्यांनी आरोग्य विभाग व शासनाला सहकार्य करावे व या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.









