घे भरारी फाऊंडेशनतर्फे विविध कार्यकम सादर
सावंतवाडी । प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त ‘घे भरारी फाउंडेशन ‘ तर्फे युवती व महिलांसाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महिला दिनाच्या पुर्वसंध्येला जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे हा कार्यक्रम पार पडला. यात सकाळी पाककला स्पर्धा झाली. विजेत्यांना पारितोषिके देत गौरविण्यात आले. सायंकाळी खेळ पैठणी हा कार्यक्रम घेण्यात आला. कुडाळ येथून आलेले स्पेशल भाऊजी समीर चराठकर यांनी या कार्यक्रमात जान आणली.
यामध्ये प्रथम पारितोषिक पैठणीच्या निशिगंधा पेडणेकर मानकरी ठरल्या. एस. एम. मडकईकर ज्वेलर्सच्या माध्यमातून प्रथम विजेतीसाठी ५ हजार रुपयाचा एक ग्रॅम सोन्याचा नेकलेस सेट देण्यात आला.
दृतिय पारितोषिक कांजीवरम साडी समिक्षा मालवणकर, तृतीय पारितोषिक इरकल साडी रूचिता राऊळ या मानकरी ठरल्या. यांना देखील एस.एम. मडकईकर सुवर्णकार यांच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे सौ. वैष्णवी मडकईकर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच वक्तृत्व स्पर्धा महिलांसाठी व युवतींसाठी घेण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ राजू पनवेलकर यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ विजेत्यांना मोत्याचा सेट देण्यात आला. सीमा मठकर यांच्याकडून साडी भेट देण्यात आली. घे भरारी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्ष रिया रेडीज, सेक्रेटरी सरिता फडणीस, खजिनदार अदिती नाईक, रेखा कुमठेकर, संचालिका शारदा गुरव, ज्योती दूधवडकर,सलोनी वंजारी, दर्शना बाबर-देसाई, धनश्री इंदुलकर, वंदना मडगावकर, सीमा रेडीज, मेघना साळगावकर, सुष्मिता नाईक, स्वप्नाली कारेकर, साक्षी परुळेकर, गीता सावंत, मेघा भोगटे, प्रतीक्षा गावकर, अर्चना खानोलकर आदी उपस्थित होत्या.
Sindhudurg