गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत मराठी व सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला
पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापकवृंद, महाविद्यालयाचे प्राचार्य व जी. एस. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांचे मराठी व सांस्कृतिक विभाग प्रमु डॉ. जालिंदर जाधव यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे वाड्मय मंडळाचे अध्यक्ष अवधूत समगिसकर यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. आनंदिता आग्रे हिने प्रास्ताविक करतांना मराठी राजभाषा दिवसाचे महत्व सांगताना मराठी भाषेचा उगम ते संत, पंत व शाहीरी काव्याचा आढाव घेत कविवर्य कसुमाग्र यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांनी मराठी भाषा ही किती समृद्ध भाषा आहे याची विविध दाखले देऊन मराठी राजभाषा गौरव दिवसाच्या सर्व उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्या दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विषयांवरील काव्यवाचन केले. कु. अक्षया सैतवडेकर हीने कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ कवितेचे वाचन केले. कु. दीप्ती राहटे हीने ‘वाट थोडीसी उरावी’, प्रणय शिरकर याने ‘पावंखिंडीत’, कु. तनुजा पालकर हीने ‘शहांतर’, कु. सानिका पालशेतकर हीने ‘भिजलो तरीही’ इ. कवितांचे उत्कृष्ठ पद्धतीने वाचन केले. कु. वसुधा भागडे हीने ‘भाकरी’ शिकवण देणारी कथा या कथेचे उत्कृष्ठ कथन करून विद्यार्थाना मंत्रमुग्ध करून टाकले. यावेळी मराठी व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी ‘शिकणाऱ्या भावा रं’ हे विलास घोगरे लिखित क्रांतिकारी गीत उपस्थित श्रोत्यांना कोरस देण्यास सांगून सामूहिक पद्धतीने सादर करून सर्वांना वेगळाच आनंद देवून मंत्रमुग्ध केले. प्रा. चैत्राली झिंबर यांनी मराठी भाषेचे वैभव कसे आहे याचे सुरवतीपासूनचे विविध दाखले देऊन मराठी भाषा समृद्धीने कशी सजलेली आहे. हे समजाऊन संगितले व मराठी राजभाषा गौरव दिवसाच्या सर्व उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्या दिल्या. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मांनोगतातून मराठी भाषाचे महत्व सांगून आपण सर्वांनी जास्तीतजास्त आपली मराठी मातृभाषा दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणावी असे आवाहन केले.
यावेळी व्यक्तीच्या रोजच्या व्यावहारिक भाषेत सहजपणे वापरत येणारे इंग्रजी भाषेतील शब्द कोणते आहेत. त्या शब्दांना मराठी भाषेत कोणते शब्द आहेत. जे आपण उपयोगात अथवा वापरत आणत नाही. आजच्या तरुण पिढीला ते माहीत व्हावेत म्हणून इंगजी शब्दांना पर्यायी मराठी कोणता शब्द आहेत अशा प्रकारचा प्रश्न आणि उत्तर स्वरुपाच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थाला चॉकलेट देऊन त्याचे अभिनंदन केले जात होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे, जी. एस. देवराज टाकळकी, डॉ. प्रमोद देसाई, डॉ. प्रसाद भागवत, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. चैत्राली झिंबर, प्रा. कांचन कदम, डॉ. प्रवीण सनये, प्रा. लंकेश गजभिये, डॉ, जालिंदर जाधव, ग्रंथपाल श्री. धनंजय गुराव, ग्रंथालय परिचर श्री. परशुराम चव्हाण, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष अवधूत समगिसकर व सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मराठी वाड्मय मंडळाच्या सर्व पदाधिकारी व प्रतीनिधींनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अवधूत समगिसकर, कु. अदिती कुलकर्णी, कु. अपूर्वा साळवी, कु. गुंजन पटेल, कु. मनाली नाचरे यांनी केले तर उपस्थित मान्यवर व श्रोतुवर्ग यांचे आभार मराठी व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी मानले.











