शिरगाव केंद्रावरील बैठक व्यवस्था 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा

शिरगाव( वार्ताहर)  माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ पुणे यांच्यावतीने घेण्यात येणा-या दहावीच्या परिक्षेकरिता बैठक व्यवस्था शिरगाव केंद्रावर करण्यात आली आहे.या केंद्रावर २८६ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

या परिक्षा केंद्रात शिरगाव हायस्कूल, महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार , आदर्श विद्यामंदिर किंजवडे, माध्यमिक विद्यामंदिर साळशी, माध्यमिक विद्यामंदिर कुवळे, शिक्षण शाळा कोळोशी- हडपिड या सहा शाळातील २८६ विद्यार्थी परिक्षेला बसले असून या विद्यार्थ्यांची १३ वर्ग खोल्यामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

हि बैठक व्यवस्था बी ०१८८३१ ते बी ०१९११६ व दिव्यांगासाठी बी ०१८८८६ व बी ०१८९१४ अशी करण्यात आली आहे.

१ ते २६ मार्च या कालावधीत परिक्षा होणार आहे.