मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात अभाविपचा आंदोलनाचा इशारा

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रत्नागिरी च्या वतीने उपकेंद्र संचालकांना भेटून निवेदन देण्यात आले.

मुंबई विद्यापीठाची MSc Part I सेमिस्टर १ परीक्षा जुलै २०२३ मध्ये झालेली असून त्या परीक्षेचा निकाल २३ डिसेंबर २०२३ यादिवशी रोजी विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आले परंतु, त्यात काही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित होते. अभाविप तर्फे या विषयात दि. २१/०२/२०२४ रोजी मुंबई विद्यापीठ परीक्षा संचालकांना एक निवेदन देण्यात आले होते व त्यानुसार पुढील १-२ दिवसांत म्हणजेच २२/०२/२०२४ रोजी निकाल प्रलंबित असलेल्या काहीच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. जाहीर झालेल्या निकालात ही विद्यार्थ्यांना ATKT च्या फॉर्म भरताना MKCL च्या साईट वर दाखण्यात आलेले मार्क्स व जाहीर झालेल्या निकालातील मार्क्स यामध्ये तफावत दिसून आली. तसेच जाहीर झालेल्या निकालावर तारीख ६ नोव्हेंबर २०२३ ची असून ती जाहीर २२/०२/२०२४ ला केल्याचे ही दिसून आले. MSc सेमिस्टर १ प्रमाणे अन्य ही सेमिस्टरचे निकाल ४५ दिवसात लागणे अपेक्षित असून ही त्यात सुद्धा अशीच काही परिस्थिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून परीक्षा विभागात सुरु असलेल्या या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे.

 

या विषयात अभाविपने विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेत दि. २६/०२/२०२४ रोजी रत्नागिरी उपकेंद्र(मुंबई विद्यापीठ) संचालकांना भेटून या गलथान कारभाराच्या विरोधात पुढील मागण्या केल्या;

 

१) ज्या विद्यार्थ्यांचे निकाल अजून ही प्रलंबित आहेत त्यांचे येत्या २ दिवसांत आत निकाल लावण्यात यावा.

 

२) परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेत राहून फेब्रु. २०२४ मध्ये सुरु झालेल्या ATKT परीक्षांचा फॉर्म न भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रलंबित निकाल लागल्यावर FAIL असतील तर ती देण्याची सोय करावी.

 

३) परीक्षेत जे विद्यार्थी PASS झाले होते तरी त्यांनी फेब्रु. २०२४ ची परीक्षा दिली अश्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्यांना परत करण्यात यावे.

 

“कोंकणातील विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील प्रश्न कोंकणातच सुटावे त्यांना मुंबईत यासाठी खेपा घालाव्या लागू नये यासाठी विद्यार्थी परिषदेने मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्र परिसर सक्षमीकरण व्हावे यासाठी यापूर्वीही आग्रहाची भूमिका ठेवली आहे तरी यात जर ठोस भूमिका उचलून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान विद्यापीठ करत असेल तर विद्यापीठाच्या विरोधात रत्नागिरी मध्ये अभाविप तीव्र आंदोलन ही करेल” असा इशारा दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक अनुष्का राणे यांनी दिला.