भांबेड धनगरवाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न


तांडावस्ती अंतर्गत रस्त्यासाठी ९.९० लाख रुपयांचा निधी मंजूर

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड येथील धनगर वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आज शुक्रवारी १ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास भाजपाच्या विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांच्या हस्ते झाले.
भांबेड धनगरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची गेला अनेक वर्षांपासून मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन भाजपाच्या राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी तांडा वस्ती अंतर्गत या रस्त्यासाठी ९.९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्याचे भूमिपूजन आज शुक्रवारी पार पडले. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर टोळे , जिल्हा सरचिटणीस संजय आयरे, तसेच भांबेड उपसरपंच श्रीकांत ठाकूर देसाई ,ग्रामपंचायत सदस्य, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.