न्यू इंग्लिश स्कूल लांजामध्ये शिक्षक दिन साजरा

लांजा (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल व तु.पु.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजामध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला शिक्षक पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. विद्या आठवले, उपाध्यक्ष हंसराज सुर्वे, सचिव हणमंत सरवळे, लांजा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण देशमुख तसेच सह सचिव राजेंद्र मारुलकर व सचिन जाधव उपमुख्याध्यापक सुनिल जाधव, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सुनिल पाटोळे , शिक्षक प्रतिनिधी वसंत आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी शिक्षक दिनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या आठवले, यांनीसर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी , विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनीही पुष्प अर्पण करून सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन केले. शाळेत जे जे विद्यार्थी शिक्षक बनले होते त्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाला पालक सदस्य उपस्थित प्रशांत भितळे,किशोर मानकर, विनोद बेनकर,सुनील अभ्यंकर,वर्षा चव्हाण, भरत सोलकर,सुर्वणा सक्रे,अंकिता मेस्री,अनिता भजनथ्री,मनाली घाडे, सुयोग वाडकर सर्व पालक सदस्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.