श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली व प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शृंगारतळी यांचा उपक्रम
गुहागर | प्रतिनिधी : श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली व डॉ ओक यांचे प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील तळवली येथे श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त गुरुवार दि 7 मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबीर सकाळी 10.30 ते 2 या वेळेत असणार असून डोळ्यांच्या स्पेशालिस्ट डॉ अश्विनी सचिन ओक या सदर शिबिरात नेत्र तपासणी करणार आहेत.यामध्ये नेत्र तपासणी अनुषंगाने असणाऱ्या प्राथमिक तपासण्या,डोळ्यांची तपासणी व चष्म्याचा नंबर काढणे,गरज असल्यास मोफत ड्रॉप्स दिले जाणार असून शिबिरातील मोतीबिंदू ऑपरेशन सवलतीच्या दरात केले जाणार आहे.या शिबिरात नाव नोंदणी करण्यासाठी 9420383455,9422505613,9527314696 यांच्याकडे संपर्क साधण्याचे तसेच सर्वांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









