खेड(प्रतिनिधी)१९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराड येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात आर.डी.सी., टी.एस.सी व आय.जी.सी. या कॅम्प मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्या एन.सी.सी. कॅडेटचा सत्कार १९ महाराष्ट्र बटालियन कराड चे सी.ओ. कर्नल जे.पी.सत्तीगिरी तसेच ए.डी.कार्तिक पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी विविध महाविद्यालयांचे ए.एन.ओ. तसेच तेथील आर्मी स्टाफ, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
आय.सी.एस. महाविद्यालयाचा एन.सी.सी. कॅडेट, सिनियर अंडर ऑफिसर सिद्धांत मोहिते याची कर्तव्यपथावर झालेल्या आर.डी.सी. परेड मध्ये सहभागी होऊन त्याने १९ महाराष्ट्र बटालियन ला अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या यशस्वी कामगिरी बाबत नुकताच त्याचा सहजीवन शिक्षण संस्था व आय.सी.एस. महाविद्यालयाच्या वतीनेही सत्कार करण्यात आला होता.












