खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील बोरज गावापासून ५ कि. मी. अंतरावर असलेल्या जंगलमय भागात लागलेल्या वणव्यात झाडे जळून खाक झाली. वणवा लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका उडाल्याने वणवा विस्तारत गेला. सायंकाळी उशिरापर्यंत जंगलमय भागात लागलेला वणवा धुमसत होता.









