वार्ताहर l पाली :मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने हातखंबा तीठा येथील समर्थ नगर भागातील ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून त्या भागातील पाणीपुरवठा काही दिवस खंडित झाला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. यामुळे तेथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्ष्यात घेऊन तात्काळ हातखंबा ग्रामपंचायतीचे सदस्य विलास बोंबले व अॅड. सुयोग कांबळे यांनी या भागात टॅंकरची व्यवस्था करून पाणीपुरवठा केला.
यावेळी हातखंबा सरपंच जितेंद्र तारवे, माजी सरपंच व सदस्य विद्या बोंबले, शिवसेना हातखंबा जिल्हा परिषद गट उपविभाग प्रमुख प्रमोद डांगे यांचे सहकार्य लाभले. तात्काळ पाणीपुरवठा केल्याने या भागातील ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.












